सब घोडे बारा टक्के
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी चाललेला सत्ताकांक्षेचा (पोर)खेळ पाहून विंदा करंदीकर यांची कविता ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता कुणाला आठवल्यास नवल नाही. सत्तेसाठी विद्यमान राजकीय सुंदोपसुंदी पाहिली की, ही कविता किती समकालीन आहे, याचे लख्ख दर्शन होते. आज ना उद्या काहीतरी होईल, कुणाचे तरी सरकार येईल, कुणाच्या तरी तोंडचा घास पळवला जाईल, पण महाराष्ट्रीय जनता मात्र आहे तिथेच राहील. म्हणून या कवितेचे वाचन अनिवार्य आहे.......